कृतार्थ भाव
झाली तयार नृत्यासाठी
केला लओभनईय शृंगार
हास्य विलसते मुखी
सुंदर केला आविष्कार
जीव प्रण ओतुनीया
केले सुंदर नृत्य सादर
झाले हावभाव परिपूर्ण
दिला प्रेक्षकांनी आदर
मन लावूनी नाचता
धुंगरु तुटून विखुरले
एकरूप होऊन नाचता
पाय जर न डगमगले
संपता नृत्याविष्कार
वेचले धुंगरु प्रेमाने
पहातेय तयां कडे
कृतार्थतेच्या भावाने
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा