आधी रिमझिम जलधारा
पसरला पाचूचा रंग हिरवा
खळ खळ वाहती नद्या नाले
जनांना आवडे ऋतु बरवा
ढोल ताशांच्या गर्जना
धुवादार बरसात
भासे फाटले आभाळ
वारा वाहे जोशात
जलाशय तुडुंब भरली सारी
दिसे टेकड्या डोंगर नितळ
दुग्ध रुपी पडे हा जल प्रपात
तर कुठे शुभ्र जलाचे ओहळ.
जल तत्व पंचत्वातील
मुक्त हस्ते वरूणाचे दान
जलचर सृष्टीची गरज
जलप्रपात निसर्ग किमया महान.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा