रविवार, ३० जुलै, २०२३

..सहाक्षरी..पावसाळी सुट्टी .../आर्त विनवणी

 आ भा म सा पण  मध्य मुंबई समूह क्रमांक २

आयोजित उपक्रम

षडाक्षरी रचना

विषय..पावसाळी सुट्टी



सुट्टी ती शाळेला

आनंद दायक

अती वृष्टी होता 

मिळे अचानक


मन आनंदले

सोबती जमले

मनात देवाचे

आभार  मानले


केले नियोजन

 कुठे  जमायचे

 खेळत खेळत 

कसे भिजायचे


होती छत्री हाती 

अंगा झोंबे वारा 

मजेच झेलल्या 

पावसाच्या धारा


पागोळया झरती 

दाराच्या समोर

पिसारा फूलता

पाहिला तो मोर


अवचित सुट्टी

दिली पावसाने 

रोज  असे यावे

खेळु आनंदाने 



वैशाली वर्तक

अहमदाबाद






कल्याण डोंबिवली महानगर 1

आयोजित उपक्रम

विषय ..येरे येरे पावसा

शीर्षक.. आर्त विनवणी 


येणार तू नक्की 

केली बी पेरणी

 बरस ना आता

 किती विनवणी           1


कष्ट करुनिया

घाम तो गाळून

केली मेहनत 

शिवारी कसून             2


ऐनवेळी आता

का रे तू रूसला

कुठे गेले मेघ   

 लपून   बसला           3



मृगाच्या पाण्याने

जीवा लागे आस

फुटतील बीजे

धरिला तो ध्यास         4


बरस रे मेघा

नको पाहू अंत

बळीची वाढवू

नकोस तू खंत             5


नेहमीच तुझे

दाखवितो खेळ

वेळेत न येणे

जमव तू मेळ                6


वैशाली वर्तक

अहमदाबाद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...