सोमवार, ३१ जुलै, २०२३

मोरपंखी स्पर्श

  प डोंबिवली समूह 2

विषय - मोरपंखी स्पर्श 


होता सुखद पहाट

रवी येताच नभात

रम्य सोनेरी  शलाका

उजळती गगनात


सोनसळी किरणांचा

स्पर्श होता वसुधेला

कशी लाजते हासूनी

पाहताच आदित्याला


मोरपंखी स्पर्श होता

दल पुष्पांचे खुलले

मंद सुगंध पसरे

दाही दिशा  दरवळे


मंद झुळुक वा- याची

करी गंधित सकाळ

अलवार पानावरी

शोभे दवांची ही माळ


वाटे सुंदर  दृश्याने

मोरपंखी अलवार

स्पर्श  किरणांचे सदा

जग  उजळले हळुवार



किलबिल येते कानी

गोड   तो  किलबिलाट

मंद स्वर भुपाळीचे

किती रम्य ती पहाट


वैशाली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

अलिप्तता व दुर्लक्षता

अलिप्तता आणि दुर्लक्षता. तसे पहाता दोन्ही   प्रवृत्ती.वेगवेगळ्या आहेत.  .मनुष्याच्या स्वभावाची जडण घडण ही  तो लहानाचा मोठा   होतो.          ...