कामगारांची खंत
करितो काबाड कष्ट
दिवसभर नित्य राबून
पोटाच्या खळग्या साठी
दिवस रात्र एक करुन
खरे पहाता जशी दिसे
उभी सुंदर इमारत
करीती वर्णन सौंदयाचे
गुणगान गाण्यात नाही थकत
पण पाया भरणी विट
दिसत नाही कुणाला
असे ती आधारभूत
सर्व वरच्या सौंदर्याला
करणारे कष्टकरी याची
सदा हवी मनी जाणीव
तेची कामाची घेती दक्षता
ठेवता न कशाची उणीव
एक दिवस देऊन मान
फेड होत नाही उपकाराची
मनी ठेवा मान कष्टाचे
जाणा खंत कामगारांची
द्यावा परिश्रमाचा मोबदला
जाणूनी कष्टाची खंत
नको व्हायला हयगय
द्यावी विश्रांतीसाठी उसंत
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा