बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२

अभंग श्रावण व्रत/ मज अभय दे

विषय - श्रावण व्रत 

व्रत वैकल्याचा  । महिना श्रावण । 
पवित्र पावन      । सदासाठी  ।।

येता सोमवार    । वाहू बिल्व पत्र । 
महादेव मंत्र    ।   चालतसे   ।। 

श्रावणात येती  ।  सणवार खास । 
मोद हमखास ।  मनातूनी       ।। 

 नाग पंचमीला । नागाचे पूजन। 
ऋणांचे स्मरण । करितात  ।। 

अष्टमीच्या रात्री । देवकी नंदन  । 
आनंदे किर्तन   ।  मंदिरात    ।। 

ऋषी पंचमीला  । करी उपवास । 
बैलासाठी खास   ।  श्रावणात

वैशाली वर्तक 

अहमदाबादभाग्योदय  लेखणीचा मंच
आयोजित 
विषय - मज  अभय दे 

देवीचे पूजन  ।  करण्या  हजर । 
करीत गजर  ।   अंबाईचा   ।। 

सुंदर  ते रूप । घरोघरी दीप
देवीच्या समीप । लावियले  ।। 

 देवी तुझ्यासाठी ।   केलीय तयारी । 
  मनास उभारी  । तूची देशी ।। 


देवीच्या  स्वागता  ।  मोद वाटे फार
सहते ती भार      । जगताचा  ।। 

देवी ठेव कृपा   ।  तुजला सांगणे  । 
नुरते मागणे     ।  तुजलागी  ।। 

मज अभय दे  ।  मजला दे शक्ती । 
करीन मी भक्ती । नित्यनेमे  ।। 

सहवासे तुझ्या  ।  जागतो विश्वास । 
लागलाची  ध्यास  । अंतरंगी  ।। 

वैषशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...