अशी तू
वाटे जवळची मला
लेखणी सखी तू अशी
किती आवडे मला ती
सांगू शब्दात कशी
भाव माझ्या मनीचे
तूच जाणिते क्षणात
झरझर शब्द झरती
जरा येताची मनात
तुज विना पळभर
मज सुचत नाही
नजरे समोर न येता
तुजला शोधत राही
किती काव्यात दिधली
तूच मजलाच साथ
लेखनात मला वाटे
तूच देतसे मला हाथ
तुझ्या बळावर रहाते
मी निवांत लेखनात
किती तू आवडे मलां
सांगु कुठल्या शब्दात
वैशाली वर्तक
अहमदाबादकल्याण डोंबिवली महानगर २
आयोजित
काव्यलेखन
विषय .. रुसवा सोड ना
शीर्षक..खुलता कळी खुलेना*
असे काय ग झाले आज
सांग मजवरी का रुसली
काही न बोलता कधीची
गुमसुम होऊनी बसली 1
न येती आज विचार मनी
पाही न वळूनी मजकडे
किती मनवावे तुजला
कसे काही न सुचे गडे 2
विषय पाहिला बदलूनी
नको पद्य तर गद्य पाहू
तुझे झरणे कर ना सुरु
अशी रुसूनी नको राहू 3
दिन एक पण नसे शक्य
तुला न धरिले मम करी
उदासीन वाटे दिनभर
काय करु तू सांग तरी 4
हाश ! हसली तू खुदकन
जणू चमकली नभी चांदणी
भावना मनी स्फुरल्या बघ
धावत आली पहा लेखणी. 5.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा