शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२

चांदरात शिरोमणी काव्य. रातराणी

शब्दांकुर साहित्य  उपक्रम 
शिरोमणी काव्य
विषय - *चांदरात*



आठव
भेट आपुली
होती चांदरात सुंदर 
नभी ता-यांचा खेळ मनोहर

गंध 
स्मरतो सुमनांचा
थंड हवेचा गारवा
चांदराती मिळूनिया गायलेला मारवा

किती
सुरेल सुरात
होती  चांदरात रंगलेली
भेट चंद्र  साक्षीत घडलेली

फुले 
गंधित हासली
पाहूनी अबोल प्रीत
वदली हीच प्रेम रीत

वैशाली वर्तक
अहमदाबाद










रजनी साहित्य  समुह
उपक्रम  -- शिरोमणी काव्य

**रातराणी*

सांजवेळी
पहा अंगणी
कशी बहरली रातराणी
जणू गाई प्रीतीची गाणी

सुगंध
दरवळला आसमंतात
रातराणी मोहवी मनाला
भेटीस   आतूर त्या  क्षणाला

रातराणी
सांगे बघ
आता झाली सांजवेळ
नभात चाले शशीचा खेळ

रातराणी
सावळी रंगात
दरवळे गंध आसमंतात
चांदण्या उतरल्या जणू अंगणात
वैशाली वर्तक





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...