भाग्योदय लेखणीचा मंच
आयोजित
प्रथम फेरी ३१/८/२२
मुक्तछंद काव्य रचना
*स्पर्धेसाठी*
विषय - वंदन तुला गणेशा
*स्मरते तुजला*
होता सकाळ स्मरते तुजला
तूची असशी सुखकर्ता
असशी तूची संकटहर्ता
किती नावे संबोधू रे तुजला
गजानना रे गणराया.
तव दर्शनाने मिळे सौख्य
भय दुःख सारे होतेची दूर
तूची असशी दुःख हराया
वंदन म्हणती मोरया मोरया.
विद्यार्थी जन वंदती तुजला
वंदन करूनी करती प्रार्थना
तव कृपा दृष्टीची करती याचना
शरण आलो भगवंता.
यावे गणराया विद्या देण्या
प्रथम पुजेचा तुजलाची मान
देश परदेशी तुझेच गुणगान
चौदा विद्या तुज अवगत
प्रार्थते तुजला एकदंता.
रणांगणावर तुची धुरंदर
नयन उघड रे क्षणभर
वंदन करिते मी दिन रात्र
तव नामाचा महिमा अपार
शब्द नसे मजपाशी
तव गुण गाया
तूची गजानना गणराया
वैशाली वर्तक
अहमदाबाद
***************--**********************-**
अभा म सा प समूह 2
आयोजित उपक्रम ५१३
विषय - पुढच्या वर्षी लवकर या
*वेळ विसर्जनाची*
गणपती आले म्हणता म्हणता
आले की हो विसर्जन
किती आनंदाचे होते क्षण
सरले दिन भरकन
रोज एकत्रित आरती
वाटे आनंदाचा सोहळा
भजन, मंत्र -जागर स्तवन
करण्या आप्त जन झाले गोळा
मोदक लाडू पेढ्यांची
होती वेगळीच शान
खाणे, गप्पांना आले
खास आनंदाचे उधाण.
पण आता म्हणता आरती
डोळे पहा पाणावले
लहान मुलांना सावरता
मोठे जनपण रडावले
बाजुला शेदोरी ठेवीता
बाप्पा ssबाप्पा मोरया
शब्द ते आले ओठी
*पुढल्या वर्षी लवकर या*
वैशाली वर्तक
अहमदाबाद
लालित्य नक्षत्र वेल आयोजित उपक्रम
विषय .. निरोप तुला देताना
*वेळ विसर्जनाची*
गणपती आले म्हणता म्हणता
आले की हो विसर्जन
किती आनंदाचे होते क्षण
सरले दिन भरकन
रोज एकत्रित आरती
वाटे आनंदाचा सोहळा
भजन, मंत्र -जागर स्तवन
करण्या आप्त जन होती गोळा
मोदक लाडू पेढ्यांची
होती वेगळीच शान
खाणे, गप्पांना आले
खास आनंदाचे उधाण.
पण, आता म्हणता आरती
डोळे पहा पाणावले
लहान मुलांना सावरता
मोठे जन पण रडावले
बाजुला शेदोरी ठेवीता
बाप्पा ssबाप्पा मोरया
शब्द ते आले ओठी
*पुढल्या वर्षी लवकर या
*निरोप तुला देताना*
मन होतंय उदास
उत्साहात सजविलेले मखर
उद्या भासेल भकास
वैशाली वर्तक
अहमदाबाद
.***************
.******************************-*****************
अ भा म सा परिषद समूह 2
आयोजित उपक्रम
काव्य लेखन
प्रकार काव्यांजली
विषय - गणपती विसर्जन
गणेशाचे विसर्जन
पहाता पहाता
आला दिन विसर्जनचा
निरोप घेण्याचा
गणेशाचा.
विसर्जनाचा दिन
जीवा लागे हूरहूर
दाटले काहूर
मनोमनी
संपता आरती
पाणावली जनांची लोचने ,
गणेशाचे परतणे
सहवेना.
गणपती बाप्पा
निघाले आपुल्या सदनी
खेद मनोमनी
प्रत्येकाच्या
मोरयाचा गजरात
भक्ती भाव एकवटून
सांगती परतून
यावे
मृत्तिकाची मूर्ती
सहज विसर्जली पाण्यात
पर्यावरण जपण्यात
सहजपणे .
तुझ्या कृपेचा
राहो गणपती देवा
निरंतर ठेवा
असावा
वैशाली वर्तक
(अहमदाबाद ) ,
*************************************
माझी लेखणी भक्तीसागर मंच
विषय - *क्षण विरहाचे सारे*
विसर्जन
*आले आले म्हणताच
झाली वेळ परतीची
नको वाटे त्याचे जाणे
वेळ ती विसर्जनाची
दहा दिवस मोदात
येणे जाणे स्व जनांचे
किती गप्पागोष्टी खेळ
दिन होते आनंदाचे
सजावट वाटे फिकी
धूप दीप मंदावले
घर झाले सुने सुने
बाप्पा गृही परतले
बाप्पा बाप्पा म्हणताना
डोळे पाणावले क्षणी
जड मनाने निघालो
विरहाचे दुःख मनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
देवा श्रीगणेशा
निरोप घेतो म्हणता देवा
शब्द निघेनात मुखातून
अंतःकरण झालेआमचे
अतिशय जड.
आला तेव्हा होती प्रसन्नता
मनी होता आनंद उल्हास
पण आज निरोप घेता
जनमुखावरी उदासिनता.
केली भक्ती भावे पूजा अर्चना
झाल्या असतील कळत नकळत
अमुच्या हातूनी चुका
घे तयांना तव उदरी
आम्ही बालक आहोत अजाण.
ऋणी राहू तव कृपेचे सदा
असूदे आशीर्वाद शिरी
राहू सारे मिळून मिसळूनी
ध्यानी ठेवू शिकवण सदा उरी
तूची गणांचा अधिपती
ठेवू मनी श्रध्दा विश्वास
द्यावी आज्ञा आम्हा विसर्जनाची
वैशाली वर्तक
स्वराज्य लेखणी मंच
गणपती महोत्सव महा उपक्रम
क्रमांक 2
काव्य रचना सहाक्षरी 20-9-23
विषय ..देवा तुझी ओढ
या s हो लवकरी
आतुरता मनी
*देवा तुझी ओढ*
लागे क्षणोक्षणी. 1
रेखीव आरास
करूनी विचार
काही नाविन्याचा
खास तो प्रकार. 2
ओवाळण्या दारी
काढली रांगोळी
तोरणे लावूनी
दिपकांच्या ओळी. 3
श्रीगणेशा मज
सुख अविरत
तुझ्याच चरणी
मिळते खचित. 4
होता आगमन
घराचे मंदिर
पूजा भक्ती भावे
दर्शना अधीर. 5
घेता तव नाम
दु:ख दूर सारी
तुझ्याच चरणी
जादु असे न्यारी. 6
रूप पाहुनिया
मन होते शांत
तुची सुखकर्ता
नुरतेच भ्रांत. 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा