मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

बाप्पा माझा मार्गदर्शक/ मनातील बाप्पा /परतले श्री सदनी \बालगीअभंग

गणेश चतुर्थी स्पर्धा 
सावली प्रकाशन समूह आयोजित 
गणेश चतुर्थी निमित्त  राज्य स्तरीय  काव्य लेखन स्पर्धा
*स्पर्धेसाठी*
विषय - बाप्पा माझा मार्गदर्शक
शीर्षक -   *कृपावंत व्हावे बाप्पा*


देवा गणराया गजानना  
व्हावे कृपावंत मजवरी
*बाप्पा माझा मार्गदर्शक*
स्मरते तुजला  निरंतरी

तूची पालक  या विश्वाचा
तुझ्या कृपेने  चाले सृष्टी 
हवी माया तुझी जगतावरी
नको करू कोणास कष्टी

चौदा विद्याही तुज अवगत
बुध्दीमान न्  देवांचा देव 
गणराया तूची ज्ञानदाता
प्रसाद रुपे द्यावी ज्ञानाची  ठेव


कार्यारंभी  प्रथम पुजिते
तुलाच स्मरते   गणराया
यावे घावूनी  कष्ट सारण्या
देण्या विश्वा कृपेची छाया

भवतापाने पिडलो आम्ही
तुम्ही व्हावे दिशा  सूचक 
वंदन करोनी मागते तुजला
गजानना तुची अमुचा पालक

   वैशाली वर्तक
   अहमदाबाद












भा सा व सां मंच लातुर जिल्हा 
आयोजित  
पहिला वहिला उपक्रम 
१२  व १३ सप्टे२२
विषया -  मनातील बाप्पा


सर्व  देवांचा देव गणपती
असे तोची संकट हारी
सारे करीती त्याची भक्ती
आहेच गणराया सुखकारी

पाहता मूर्ती  गणेशाची
वाटे प्रसन्नता मनात
मनाचे गा-हाणे सांगण्या
मन होतेची तयार क्षणात

गणराया असेची ऐसा
ऐकतो सा-यांच्या मनीच्छा
म्हणूनच तर वसे मना मनात
परी पूर्ण करिता, देतो शुभेच्छा

 आला होता पाहुणा म्हणूनी
दिधला आनंद जन मनाला
घडवून भेटी आनंदाचा सोहळा
आनंदमय जीवन दिधले जगताला.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद


काकडे देशमुख शिक्षण संस्था 
आयोजित गणेश चतुर्थी निमित्त काव्यलेखन स्पर्धा 
विषय ..  आपल्या मनातील बाप्पा 
शीर्षक..   लाडका बाप्पा 

सर्व  देवांचा देव गणपती
असे तोची संकट हारी
सारे करीती त्याची भक्ती
आहेच गणराया सुखकारी.


पाहता मूर्ती  गणेशाची
वाटे प्रसन्नता मनात,
मनाचे गा-हाणे सांगण्या
मन तयार असतेची  क्षणात.


गणराया, असेची ऐसा
ऐकतो सा-यांच्या मनीच्छा.
म्हणूनच तर वसे मना मनात
परी पूर्ण करिता, देतो शुभेच्छा.


बाप्पा येणारच्या खुशीने 
 रंग रंगोटी  होते घरांची
 मना -मनातील बाप्पा साठी
 चंगळ लाडु मोदक पक्वान्नांची.


येतो चार दिवसाचा पाहुणा 
देतो आनंद  सकळ जन-मनाला
घडवून भेटी आप्त जनांच्या 
आनंदमय जीवन देतो जगताला.

वैशाली वर्तक 
अहमदाबाद 




भारतीय साहित्य  व सां मंच कोल्हापूर 
आयोजित 
चित्र  काव्य उपक्रम

         सदनी परतले श्री

 परतले श्री तयांच्या सदनी
 अगतिक दिसती  दर्शनास
माता पार्वती येतील लगेच
 गणेशच्या स्वागतास

 
सांगतील मातेला आता
कसा झाला उत्सव सोहळा
 पृथ्वीवरील  सर्व  वृत्तांत
 जन  किती सारे होते गोळा

पृथ्वीवर  कशी सुधारणा
 केली आहे विसर्जनात 
पर्यावरणाचे  महत्त्व 
छान कळले आहे समाजात

वाटेल मोद माता पित्यांना
ऐकून  वृत्तांताची कहाणी
 गणेशजींना खुश पाहून 
गातील त्यांची स्तुती गाणी.

वंदन करीतो  गणराया
  भक्तीभाव   मम अंतरी
तव दर्शना जमली 
भक्त मंडळी  मंदीरी


वैशाली वर्तक 
अहमदाबाद




सिद्ध साहित्यिक समूह
आयोजित उपक्रम
बालगीत
विषय .. गणपती बाप्पा 

 बाप्पा  तुम्ही येताच घरी
 आम्हा मुलांची मजाच खरी.  ..धृवपद 

घर दिसे सुंदर न सुशोभित
मखराची झाली पूर्ण तयारी 
माझीच मोठी  मदत ती भारी
आम्हा मुलांची मजाच खरी.  1

कानात सांगतो गंमत खरोखर 
केलेत मोदक लाडू  पूर्ण शंभर
रोज रोज मिळणार तुम्हाला जरी
तुमच्या संगे मुलांची मजाच भारी 

एकदाच का  हो येता घरी
रोज रोज या ना तुम्ही तरी
मिळेल शाळेला सुट्टी हो बरी
आम्हा मुलांची मजाच खरी 


वैशाली वर्तक
अहमदाबाद



काव्य निनाद साहित्य मंच पुणे
आयोजित उपक्रम
क्रमांक 8
विषय .. पार्वती नंदन
  
गणपती बाप्पा | पार्वती नंदन |
करीते वंदन     |    भक्ती भावे || १

तूची तात मात | ठेवी कृपादृष्टी |
न करीशी कष्टी| कदाकाळ|| २

प्रथम पूजेचा | असे तुज मान |
करिती सन्मान| सदा काळ || ३

 तूची गणराया | रणी धुरंधर |
 कृपा निरंतर  | ठेवीतसे || ४

तव नाम  घेता |  मन होई शांत. |
नुरते न भ्रांत |  गणराया ||  ५

पार्वती नंदना | आले मी शरण |
करीते नमन |मनोभावे. ||.   ६

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...