माझ्या मुठीत सारे तारे भरून घेते
एकेक मोजताना डोळे मिटून घेते
केव्हातरी लिहावी वाटे मनी सदा ती
होणार का मनीषा पूर्ती खरी कदा ती
आनंद वाटतांना मौनात का रहावे
दुःखात जीव असता हसरे कसे रहावे
ओठातशब्द आहे कोणास ऐकवावे
वेड्या मनास माझ्या केव्हा तरी कळावे
घेऊ कशी भरारी आकाश उंच आहे
माझ्या मनात सारा तैयार मंच आहे
देवास पूजताना मोहात का पडावे
भक्तीत देव दिसता लोभास का स्मरावे
दुःखात देव येतो देवास आठवावे
आनंद तोच देतो त्यालाच आठवावे
रस्त्यात चालताना गीतात का रमावे
गीतातल्या स्वरांना कंठात आळवावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा