शनिवार, ६ ऑगस्ट, २०२२

आंतरंगात तुझाच वास

कल्पतरु जागतिक साहित्य  मंच
आयोजित  
उपक्रम 
विषय - अंतरंगात तुझाच वास

       
नित्य  होतेच  सकाळ
घेऊनी येते नव आशा
अंतरंगीच्या तुझ्या   वासाने
जीवनातून जाते निराशा

येवो संकटे कितीही
मनी आहे दृढ विश्वास
उभा रहातो तू पाठीशी
मदतीला येतो हमखास 

येतो धावूनी सख्याहरी
अंतरंगी असता तुझाच वास 
धावा करिता मनोमनी
 मदतीला  येतोची खास

अंतरंगात तुझाच वास
तारिल्यास तुकोबाच्या गाथा
 धावी भक्तांच्या मदतीला
 देवा  चरणी  ठेवीते माथा

अंतरंगी तुझ्या  वासाने
जीवनी दिधलेस  सारे
सुंदर  आयुष्य  जगता
पहाते सृष्टी चे रुप न्यारे


वैशालीवर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...