बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

पावसाळी सहल

 लालित्य नक्षत्र वेल

विषय - सहल पावसाळी


       *

अहमदाबाद



अ भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे महाड तालुका शाखा आयोजित

उपक्रम क्रमांक २९५

विषय ... वर्षा सहल

 शीर्षक...*रम्य निसर्ग*


  पावसाळी सहलीचा

  येता  मनात विचार

 एकमते सारेची वदले

 चला जाऊ आम्ही तयार


 होता झुंजुमुंजू निघालो

 सोबतीस  रेशीम  धारा

अंगावर मजेत  झेलता

गाणी गात होता वारा


थंड वा-याची झुळूक

जाई कानात सांगूनी

बघ नाना ढंगी मेघ

अलवार गेले स्पर्शूनी


पायवाट  निसरडी 

जपून टाकीत पाऊल

सर करायाची  टेकडी

याची लागली चाहुल


नाना रंगी गवत फुले

किती सुंदर  मोहक

वा-यासंगे होती डुलत

भासली चित्ताला वेधक


हिरव्यागार पातीवरती

दव बिंदूची  शोभे माळ

रवीराजाच्या किरणांनी

प्रसन्नतेत झाली सकाळ


 येता जवळ टपरी चहाची

 धाव घेतली  तिच्या कडे

थेंब थेंब पावसाचे झेलत

 पहात होतो हिरवळी कडे


 चहाच्या घोटा बरोबर

 गरम कांदाभजी मस्त

 गप्पांना येता ऊत

 मजेत केली   की फस्त


रोजच्याच जीवनात

असा विरंगुळा हवा

देतो जीवाला आनंद

दिवस वाटे नवा नवा



वैशाली वर्तक 

अहमदाबाद


अ भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे महाड तालुका शाखा आयोजित

उपक्रम क्रमांक २९५

विषय ... वर्षा सहल

 शीर्षक...*रम्य निसर्ग*


  पावसाळी सहलीचा

  येता  मनात विचार

 एकमते सारेची वदले

 चला जाऊ आम्ही तयार


 होता झुंजुमुंजू निघालो

 सोबतीस  रेशीम  धारा

अंगावर मजेत  झेलता

गाणी गात होता वारा


थंड वा-याची झुळूक

जाई कानात सांगूनी

बघ नाना ढंगी मेघ

अलवार गेले स्पर्शूनी


पायवाट  निसरडी 

जपून टाकीत पाऊल

सर करायाची  टेकडी

याची लागली चाहुल


नाना रंगी गवत फुले

किती सुंदर  मोहक

वा-यासंगे होती डुलत

भासली चित्ताला वेधक


हिरव्यागार पातीवरती

दव बिंदूची  शोभे माळ

रवीराजाच्या किरणांनी

प्रसन्नतेत झाली सकाळ


 येता जवळ टपरी चहाची

 धाव घेतली  तिच्या कडे

थेंब थेंब पावसाचे झेलत

 पहात होतो हिरवळी कडे


 चहाच्या घोटा बरोबर

 गरम कांदाभजी मस्त

 गप्पांना येता ऊत

 मजेत केली   की फस्त


रोजच्याच जीवनात

असा विरंगुळा हवा

देतो जीवाला आनंद

दिवस वाटे नवा नवा



वैशाली वर्तक 

अहमदाबाद



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...