शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०२२

ताई तुझ्या प्रेमाचा होऊ कसा ऊतराई ( ताई तू दुजी आई )

स्पर्धेसाठी
मनस्पर्शी साहित्य  परिवार आयोजित 
रक्षाबंधन विशेष  राज्यस्तरीय काव्य स्पर्धा
विषय - ताई तुझ्या  प्रेमाचा होऊ कसा ऊतराई

          *ताई तू दुजी आई*

तुझी  आठवण सदैव येत राही
छबी तुझी नजरे आड होत नाही

किती केले लाड तूच बालपणी
आई सम माया तुझी आहे मनी


चूक माझी  होता तूची घेई सावरून  
तुझ्या  पदरा आड बसे मी लपून

 परीक्षेला जाता तुझा  शिरी हात
 उज्वल यशात असे तुझीच साथ

आई बाबांची झालीस आता आई
उपकारांचा कसा होऊ मी उतराई

आज रक्षाबंधन तुला माझेची वंदन
तुझ्या  प्रेमानं  दिले मला संजीवन

तुझे शांत हसत मुख  आहे सोज्वळ 
तुझ्या  प्रेमाने मला केले जीवनी उज्वल

या जन्मात  तरी कसा होणार उतराई
मागणे देवास जन्मोजन्मी हीच मिळो ताई


वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...