बुधवार, १० ऑगस्ट, २०२२

विषाची परीक्षा

कल्पतारु जागतिक साहित्य  मंच
आयोजित 
उपक्रम 
विषय - विषाची परीक्षा


लाभला मानव जन्म सत्कर्मे
करु तयाचे सार्थक
या जन्मावर या जगण्यावर
करूया प्रेम  नितांत
बनवा जीवन सुंदर गाणे
जाणीव असता जीवन मर्म
विवेक बुद्धी ने करु विचार 
नको आवाक्या बाहेरची कर्म
क्षमतेनुसार निवडा  दालने 
कशाला   हवी विषाची परीक्षा 
करु साध्य आपपल्या कुवतीने
नको सदा शिरी अनेक अपेक्षा
सदा संगत हवी चांगली
लक्ष न जाते वाईट कामी
येत नाही वेळ विष परीक्षेची
हीच आहे जीवनी युक्ती  नामी

वैशाली वर्तक 
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...