कडू
सर्व चवीनी युक्त असे
आपला रोजचाआहार
गोड आंबट तिखट चवीत
कडु चवीला मान अपार
उगा का गुढी पाडव्याला
खाती कडू नींब आवर्जून
दूर करी आजार सारे
वर्षभराचे जाती पळून
कडू चवीचा स्वाद हवा
काही रोगास हमखास
कडू कारले गुणाचे
मेथी असे, वात हरण्यास
औषधे तर असती कडू
रोग दूर करण्यात कामी
कडू चवीचे करावे सेवन
आरोग्य राखण्यात युक्ती नामी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा