अभा म सा प समूह २
दि 3/8/22
उपक्रम क्र ५००
विषय - आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदमय जीवन
जीवनात आहे मोद
शोध तयासी मानवा
क्षणो क्षणी विलसते
येई रोजची तो नवा
रोज येई नवी ऊषा
रवी आणितसे आशा
कर स्वागत तियेचे
नको मनात निराशा
जीवनाचा डोह पहा
बघ ते मोद तरंग
भरलेला आनंदाचा
शोध नव आशा उमंग
असे जीवन जगता
दुःख वाटे जवा परी
लावा जीवन सार्थकी
मोद भरला जगभरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा