मंजुघोषा वृत्त
गालगागा गालगागा गालगागा
वेळ माझ्या आयुष्याचा वेचतो मी
हेच माझे सांगण्याला जागतो मी
अंतरीला लागलेले ऐकताना
वेदनांना माझ्या मनी दाटतो मी
सोबतीची हौस माझी साधताना
खूप आशा बांधलेल्या तोडतो मी
चांदराती चालण्याची मौज वाटे
चंद्र तारे यात नाते जोडतो मी
खेळखेळू जीवनाचा सोबतीने
हेच माझे शब्द तुजला बोलतो मी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा