सिद्ध साहित्यिक समूह
उपक्रमासाठी
चित्र कविता
उपक्रम ३६६
19/1/22
*जोडी आमुची आगळी*
रहातो मिळून मिसळूनी
पहा कसे गुंफियले हात
आम्ही मैत्रीणी जरी पाच
विचाराने सदा एक साथ १
हात नुसते नाही हाती
एकजुटीत नाही कमी
दावितात मी तुझ्यापाठी
विश्वासाची देत हमी २
नाही गुंफियले कुंतल एकत्र
हे तर आहे विचार धागे
पाचही डोक्यांचे विचार
पहा कसे एकत्रित मागे ३
होतात कधी मतभेद
तडजोड करितो खचित
देत साथ एकमेकींना
एकमते रहाणे मानतो उचित ४
अशी आहे पाच बोटांची
आमची सदैव जोडी
पाचही बोटे बंद करता
बंद मुठी सम आहे गोडी. ५
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा