निळा निसर्ग
देव निर्मीत नीलांगण
पहाण्यात मन दंग
कधी निळे कधी केशरी
क्षणोक्षणी बदलते रंग
रवी येता निलांगणी
सडे केशराचे नभात
निरभ्र दिसे निळा रंग
पडे बिंब जलाशयात
श्रावणमासी निळ्या निसर्गी
चढे धरेला रंग हिरवा
बरसता कृष्ण मेघ
जन म्हणती ऋतू बरवा
भर निळ्या निसर्गात
ढगाआड इंद्रधनु मागे
दावी अवनी अन नभीचे
जणु प्रीतीचे ते धागे
अ भारतीय मराठी साहित्य परिषद समूह २
आयोजित उपक्रम क्रमांक ६३२
विषय...चार रंगी काव्य
प्रत्येक रंग असे अनुपम
सूर्यप्रकाशात सामावती सारे
रंग असती सारेची मनोहर
इंद्रधनुष्य दावी रुप न्यारे
*पांढरा* दावी शांत भाव
दिसे सदा सात्विक निर्मळ
सरस्वती देवीला पहाता
कळे भाव कसा शांत सोज्वळ.
धरणी मातेचा रंग काळा
पण येता ऋतू बरवा
खुलते कशी हिरव्यारंगी
भासे नेसली शालू *हिरवा*
देव निर्मीत नीलांगण
पहाण्यात मन दंग
*सु -नील* नभ हे सुंदर नभ
क्षणोक्षणी बदलते रंग
रवी येता *निलांगणी*
सडे *केशरी* नभात
निरभ्र दिसे निळा रंग
पडे बिंब जलाशयात.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कल्पतरु जागतिक साहित्य मंच
आयोजित उपक्रम
विषय..नभाचे रंग
देव निर्मीत नीलांगण
पहाण्यात मन दंग
कधी निळे कधी केशरी
क्षणोक्षणी बदलते रंग
रवी येता निलांगणी
सडे केशराचे नभात
निरभ्र दिसे निळा रंग
पडे बिंब जलाशयात
श्रावणमासी निळ्या निसर्गी
चढे धरेला रंग हिरवा
बरसता कृष्ण मेघ
जन म्हणती ऋतू बरवा
भर निळ्या निसर्गात
ढगाआड इंद्रधनु मागे
दावी अवनी अन नभीचे
जणु प्रीतीचे ते धागे
अशी असते किमया रवीची
दिवसभर असता नभांगणी
खरा तोची असे चित्रकार
ह्याची जाण होते मनोमनी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा