शनिवार उपक्रम
विषय - देवघर
सदनात असे महत्वाचे
स्थान सदैव देवघराचे
दिशा पाहून ठरविती
ठिकाण देवांना ठेवण्याचे
पाहताच देवघर मनी,
प्रसन्नतेचे येती भाव
दूर होई चिंता दुःख
नैराश्याचा सदा अभाव
रोज अंगणी फुलती
फुले विविध रंगीत
करिते देवा अर्पण
भक्ती भावे समर्पीत
देवघर पाहता जनांचे,
नकळत कर जुळती
देवघराची शान पाहूनी
हर्षित भाव उमटती
घरात सर्वात आकर्षक
भासे, अर्थात देवघर
त्याच्या शिवाय घरात
न आवडे क्षणभर
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा