उपक्रमासाठी
शब्दरजनी साहित्य समूह
आयोजित उपक्रम अष्टाक्षरी गीत लेखन काव्य
विषय - पाटी कोरी नशीबाची
*आस सुटली यशाची*
आस होती सुयशाची
पाटी कोरी नशीबाची धृवपद
केले प्रयत्न अपार
दैव अडलेची फार
छाया दाटे नैराश्याची
पाटी कोरी नशीबाची 1
विनाशाचा चाले खेळ
आली बिकट ही वेळ
न सरे निशा दुःखाची
पाटी कोरी नशीबाची 2
आली जगी अवदसा
हरवला कवडसा
आली वेळ संकटाची
कोरी पाटी नशीबाची 3
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा