*स्पर्धेसाठी*
अखंडिकल्याणकारी काव्यसमूह
फेरी 41
विषय - स्वातंत्र्याच्या अमृतोत्सव आनंदाचा क्षण
*साजरा करु सोहळा*
आला क्षण आनंदाचा
करु अमृत उत्सव
स्वातंत्र्याच्या सोहळ्याचा
करु आज महोत्सव 1
दूर झाली महामारी
वाटे आनंद याक्षणी
देशप्रेम उसळूनी
मोद वाटे मनोमनी 2
स्वदेशीचा लावू नारा
आत्म निर्भर बनुया
धरु विज्ञानाची कास
नवे शोध ते लावूया 3
दूर सारुनिया जाती
धर्म सारेची समान
बनविण्या जगतात
देश भारत महान 4
देशभक्त सुपूत्रांनी
समर्पीले त्यांचे प्राण
करु देशाचे रक्षण
ठेवुनिया मनी जाण 5
स्वातंत्र्याच्या शुभदिनी
देश रक्षणाचे काम
घेऊ मिळूनी वचन
हेच असे तीर्थ धाम 6
देश आपला भारत
बाळगुया अभिमान
मिळालेल्या स्वातंत्र्याचा
दाखवुया जगी मान 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा