शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

निसर्गाच्या कुशीत....रंग निसर्गाचे


आ भा म सा प ठाणे जिल्हा समूह १
आयोजित 
विषय - निसर्गाच्या कुशीत
     आवड निसर्गाची
निसर्गच असे देव 
तया विणा नसे जीवन
पंचतत्वानी बनलेले
देते आनंद मनोमन

होता उषःकाल पहा
 कालची कळी उमलली
अलवार हसूनी लाजूनी
सुंदर फुलात फुलली

याच निसर्गात पहा ना
वसते जल चर सृष्टी 
किती मोहक अवनी
पहावयास हवी दृष्टी 

डोंगराच्या कुशीतून
होते किरणांची उधळण
 भासे अद्भूत अविष्कार
होते तिमीराची बोलवण

 मज आवडे रमणे
 सदा निसर्गाच्या  कुशीत
वेळ जातो कसा न कळे
रहावे रमत खुशीत

वैशाली वर्तक 
अहमदाबाद







रंग निसर्गाचे
 आहे बहु रंगी निसर्ग
किती गावे गुणगान
ऋतु प्रमाणे दावी रुप
निसर्ग  असे देव महान


येता पहा रवीराज नभी
सोनेरी किरणांनी लाजत
दिसे गगन केशरी  रंगात
मुरडत येते ऊषा हासत

 फुले उमलली गंधित
पानोपानी हळुच डुलत
विविध रंगाची उधळण
सुंदर  निसर्ग खुलवत

जलाशय घेई रंग नभीचा
सुंदर  नभ सुनील रंग
रुप तयाचे पहाण्यात
मन सदैव राही दंग

येता वर्षा अवनी बहरे
 सखा तिज नटवे सजवे
रुप तिचे पार बदले
नववधू सम दिसे बरवे

  दाखवी  रंग नवे नवे
निसर्ग च चित्रकार खरा
ऋतु चक्रा प्रमाणे  दावी
निसर्गाच्या विविध त-हा




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...