आनंद भरलाय चौहीकडे
निसर्ग आनंद लुटत असे
हळुच उमलले पहा फूल
मोदे हसूनी पहातसे
होता उषा किलबिलती
घाव घेती नभात पक्षी
मस्त सुरात गाती किती
नभांगणी दिसे सुंदर नक्षी
सकाळ होता घेता दर्शन
पहा विठुचे हास्य वदन
मिळे आनंदाचा क्षण
करता वंदन जावे शरण
मिळालेले यशाचे क्षण
देती मनास हर्ष क्षणभर
असता मनी समाधान
दिसे आनंदी क्षण भरभर
वसतो आनंद मनात
शोधुनी काढा निवांतात
मिळतील आनंदाचे क्षण
करिता उजळणी एकांतात
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा