अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई आयोजित राज्यस्तरीय
काव्य लेखन स्पर्धा
क्रमांक १९
विषय - सुर्योदय
अष्टाक्षरी रचना
शीर्षक - तुझी वाट पहाते रे
कधी येशील गगनी
अधीरता मनी वाटे
तम निशेचा सारण्या
तुझी वाट मी पहाते 1
आशा रुपाने कळ्यांची
फुले फुलती सकाळी
किलबील ती खगांची
गोड भासेल भुपाळी 2
तुझ्या येण्याने वहाती
नव चैतन्याचे वारे
सडे केशराचे नभी,
मंदावती नभी तारे 3
तुज अर्ध्य देण्या उभे
जन सारेची कधीचे
तुझ्या येण्याने जाईल
सारे नैराश्य मनीचे 4
फाकलेल्या शलाकांनी
त्या सहस्त्रकिरणांनी
तुला पहाताच मनी
प्रसन्नता दर्शनानी 5
स्वर्ण रंगात येताची
मिळे जीवन जनांना
प्रफुल्लित मने जन
वदे "प्रभात "त्या क्षणांना 6
आहे जगाचाच मित्र
सृष्टी तुझ्यानेच सत्य
तूच हरतो तिमीर
स्मरतो तुजला नित्य. ७
वैशालीवर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा