अमृत वाणी साहित्य मंच आयोजित
भव्य दिव्य राज्या स्तरीय महास्पर्धा
दि 30/11/21
विषय - सुखाचा सोहळा
शीर्षक - *गोकुळ सोहळा*
कंस काराग्रही
देवकी नंदन
आठवा जन्मला
करुया वंदन 1
वसुदेव निघे
नंदाच्या गोकुळी
यशोदेच्या घरी
यादवांच्या कुळी 2
निघाला असता
गोकुळ नगरी
चरण स्पर्शाने
नदी वाट करी 3
पुत्र देवकीचा
आता झाला कान्हा
ठेवता पाळणी
यशोदेचा तान्हा 4
पाहूनी सावळे
हसरे मोहक
कृष्णची वदती
चित्ताला वेधक 5
घरी येता कृष्ण
जन झाले गोळा
कृष्ण जन्माष्टमी
*सुखाचा सोहळा* 6
वैशाली वर्तक
अहमदाबाद
समूह
साहित्य समूह
आहेत एकेक
ज्ञाने परिपूर्ण
वैशिष्टये अनेक
करिता लिखाण
रोजचे नेमाने
सवय जडते
नित्यची क्रमाने
प्रशासक देती
विविध विषय
समजून घ्यावा
तयांचा आशय
घेता समजून
लिहीणे सुलभ
संशयाचे राही
न कधी मळभ
जुडते स्नेहाचे
बंधन सहज
रोज लेखनाची
हवीच गरज
कुटुंब मानीती
सारस्वत सारे
समुहात वाहे
विश्वासाचे वारे
शब्दवेड पण
झालाय समूह
आवडीचा माझा
शब्दवेड साहित्य समूह
उपक्रमासाठी
विषय - जिद्द
सहाक्षरी रचना
कोण देते पहा
जिद्द त्या कोळ्याला
कितीदा पडून
जाळे विणण्याला १
अटी तटीचा तो
होताची सामना
जिद्द जिंकण्याची
मनीची कामना २
जिद्य शिवबाची
जिंकण्या तोरणा
केला सर किल्ला
मातेची प्रेरणा ३
जिद्द हवी मनी
येते यश दारी
काम होते पूर्ण
होई हर्ष भारी ४
जिद्यीने खेळता
मिळतेच यश
पळूनीच जाते
दूर अपयश ५
आहेच महत्व
जिद्यीचे जीवनी
राखा मनी तिला
मोद मनोमनी ६
जिद्द स्वभावात
ध्यास निरंतर
जिंकला शर्यत
गाठले शिखर ७
वैशाली वर्तक
अहमदाबाद
होळी
सहाक्षरी रचना
फाल्गुन मासात
येतो सण होळी
चला खाउ सारे
पुरणाची पोळी
पहा बहरला
गंधित मोगरा
बहावा पळस
शोभतो हासरा
करु संवर्धन
नकोची दहन
वृक्षाचे रोपण
वनश्री जतन
जाळून टाकूया
मत्सर द्वेषाला
विलसे आनंद
सदैव मनाला
सण तो रंगाचा
रंग उधळण
सारू भेदभाव
स्मरु आठवण
सप्तरंगी फुले
निसर्ग तो सारा
पळस बहवा
उधळीत न्यारा
वैशाली वर्तक
कल्पतरु जागतिक साहित्य मंच
आयोजित
उपक्रम
विषय - निःशद
असे काय झाले
मनाला कळेना
मनीचे शब्दच
अधरी येईना
रूप पहाताच
भावले मनात
हाच माझा सखा
याच विचारात
सदा राही मग्न
तयाच्याच ध्यानी
येऊनी ठाकला
होता जोची मनी
झाले क्षणभर
पहा मी निःशब्द
काय बोलणार
झाले क्षणी स्तब्ध
मनी होता हर्ष
नुरले बोलणे
प्रेमाची भाषा ती
सहज कळणे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा