मंगळवार, १ जून, २०२१

: सुख आले माझ्या दारी

 [3/10/2020, 8:20 pm] Vaishali Vartak: सुख  आले माझ्या  दारी


सुख वसे मनातच

सांगे  साधु  संत जना

नका शोधु तया जगी

आहे ते आपुल्या मना


हेच भाव मी माझ्या 

राखियले मी संसारी

भासे मजला सदाची

सुख आले माझ्या  दारी


कृपा दृष्टी ही देवाची

मजवरी सदासाठी

नाही भासली उणीव 

हरी  उभा माझ्या  पाठी


भाग्यवान  मी मानीते

वाहे आनंद सरिता

 सौख्य लाभेले  मजला

सांगे ही मम कविता


वैशाली वर्तक

[3/10/2020, 9:04 pm] Vaishali Vartak: होता मी पाहिला स्वप्नात

माझ्या  मनाचा राजकुमार

जसा हवा तसाची दिसला

आनंदाला न राहिला पारावार


उंच पुरा राजबिंडा

हसत मुख मन मिळावू

पाहताच मनी भरला

वाटले जाऊनी तया खुणावू


स्वप्नातील  संवादात

विद्याधर आहे कळले

मनीचे स्वप्न माझे

हळु हळु छान वाटले


भेटलाच  अवचित

केले संवाद  भाषण

दिली मनाची संमती

वाढले ते आकर्षण 


स्वप्नात  मी रंगले

पाहिला तो सोहळा

वाटले हवा तसा साथी

जमला  होता गोतावळा


सकाळच्या पूजेची घंटा

ऐकू येताच कानी

जागी झाले स्वप्नातूनी



स्मरते अजूनी हृदयी

ऊब तुझ्या  मिठीची

ज्याची कधी तुलना नाही

सर नाही तयात कशाची

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...