गुरुवार, २७ मे, २०२१

तिमीराकडून तेजाकडे (येईल रम्य पहाट)

अ भा म सा प समूह 02
विषय --तिमिराकडून तेजाकडे
      *येईल रम्य पहाट*

झालय खरच जीवन आता
मानवाचे अंधाराने भयभीत
आशा संपत चालली मनात
अंतची आला का पुढे कदाचित  ?

जरा नीट बसता घडी
नवनवी जगी  येते महामारी
बंद करुनी बसती घरोघरी 
कसे कमवावे हा प्रश्न भारी

कसे चालणार जग सारे
नाही उद्योग वा   व्यवसाय
प्रगती थांबली देशाची
नाही पगार तर खाणार काय

दावी निसर्ग  रुप विक्राळ
 येती अवचित वादळ खास
झाले नुकसान  घरदारांचे
 जणु दुष्काळात अधिक मास

पण नाही हरणार हिंमत
दाखवू एकात्मतेचे बळ
करण्या पाडाव आपत्ती चा
देऊ एकमेकास पाठबळ.
 
नव चैतन्याची फूलवू पालवी
दूर करु निराशेची काजळी
ठेवू दृढ विश्वास देवावरी
खचित देईल कृपेच्या ओंजळी

येईल पहा उद्याची सकाळ
सकारात्मकाचे वहातील वारे
तिमीर संपता येईल उषःकाल
 आनंदीमय होईल जग सारे.

वैशाली वर्तक
अहमदाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...