मंगळवार, २५ मे, २०२१

*सुकाळाचे दिन

कला साहित्य समूह
उपक्रमासाठी
चित्र  काव्य 
     
     *सुकाळाचे दिन*
 चित्र पाहुनिया पहा
मन कसे आनंदले
समृद्धीने मन डोले
गाव सारे संतोषले

होता कृपा वरुणाची
कष्ट फळासी आले
जन मन उत्साहात
पहा भरुन पावले

गाड्या घावती बाजारी
शिवारात दिसे मोती
दारी धान्याच्याच राशी
भरुनिया   पोती पोती

 
टिपण्यास धान्य दाणे
झाली चंगळ पाखरांची
पिल्ले येती कोंबड्यांची 
घाई त्यांना टिपण्याची


धान्य  पडे उखणात
नारी सा-या व्यस्त कामी
प्रातःकाळी उठुनिया
नसे कोणीही निकामी

दूरवर   दिसे   शेते
पीत  हरित  रंगात 
देई आनंद दृष्टीस
कृपा राहू दे देशात


चित्रासम सारे गाव 
देवा बहरु दे सदा
 सदा रहाता सुकाळ
दुष्काळची नको कदा

वैशाली वर्तक 
अहमदाबाद




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...