आवडे मज झुलणे कल्पनेच्या झुल्यावरी
काय सांगू विचारांनी मन हिंदोळते तरी
वाटे मौज मनी सदा जाता उंच नभाकडे
माझ्या मनी बांधियले मनोरथ किती गडे
पूर्ण होण्याचा आनंद येत आहे पहा तरी
काय सांगू विचारांनी मन हिंदोळते तरी
वर झोका जाता वाटे लावूया हात ता-याला
कल्पनेचा झोका माझा दावी उंच गगनाला
येता खाली निहाळती नजर जाई शिखरी
काय सांगू विचारांनी मन हिंदोळते तरी
कल्पनेचा झुला नेतो आठवात माहेराच्या
सय करीतो ते दिन रम्य त्या बालपणाच्या
रमते माझे मी पहा तासन् तास किती तरी
काय सांगू विचारांनी मन हिंदोळते तरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा