नक्षत्र वेल समूह आयोजित स्पर्धेसाठी
स्पर्धेसाठी
विषय - महाराष्ट्राची गौरव गाथा
शीर्षक - गाऊ तयाचे गुणगान
वर्ण- 16
माझा महाराष्ट्र देश , मजला जीव की प्राण
सर्व जगी भासे मज तो सर्वाहूनी महान
आहे नटलेला सह्याद्रीच्या ,कडे कपारीत
राज्य हिंदवी स्थापिले , राजेंनी याच भुमीत
संत, वीरांची, कला साहित्याची, असे ती खाण
माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण 1
इंदायणी गोदा, कृष्णा भीमा, असती सरिता
भक्ती रसप्रदाची जिथे वाहे सदा कविता
वारकरी मन , येथेची विसरे देहभान
माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण 2
स्वप्न मनीचे साकारण्या, जन येथेची येती
मिळवुन नाव , पैसा , नशीब ही घडविती
छाया माया प्रेम देण्यात, तया सारे समान
माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण 3
माझा महाराष्ट्र देश मजला जीव की प्राण
सर्व जगी भासे मज तो सर्वाहूनी महान
वैशाली वर्तक.....
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा