बुधवार, २१ एप्रिल, २०२१

गीत प्रार्थना (गीत) देवा का रे रुसलासी

शब्दरजनी साहित्य  समूह आयोजित उपक्रम 
शब्दवेड साहित्य  समूह 
आजचा विषय - प्रार्थना 
शीर्षक    *याचना*

 देवा का रे रुसलासी कशी आणलीस  वेळ
कुणा कडे पाहू आम्ही कसा मांडियला खेळ


देवा तुला विनवणी, कर कृपा जगावरी
किती भयावह  वेळ,  कर कृपा क्षणभरी
काय चुकले जनांचे ,भेटीचा नाही मेळ
कुणा कडे पाहूआम्ही,कसा मांडियला खेळ


सारे व्यवहार  ठप्प, घरीच बसणे नित्य
भूक लागणारच हे तर सदासाठी सत्य
काय झाला असा गुन्हा ,आली अशी जगी वेळ
कुणा कडे पाहूआम्ही,कसा मांडियाला खेळ


आता तरी ऐकना रे,आमची ही आराधना
कर जग पूर्वीवत ,हीच विनम्र प्रार्थना
धीर उरला ना कोणा , करना कृपेचा मेळ
कुणा कडे पाहूआम्ही,कसा मांडियाला खेळ

वैशाली वर्तक
अहमदाबाद






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...