सोमवार, १९ एप्रिल, २०२१

माझी पहिली कविता/ कविता

सावली प्रकाशन समूह
स्पर्धेसाठी
काव्यलेखन
विषय - माझी पहिली  कविता 
        *गर्विता

जपलीय  मनात मी
*माझी पहिली कविता*
अगणिक जरी रचल्या
तीच ठरली *गर्विता*

केले होते वर्णन तयात
माझ्या  बागेतील फुलांचे
एका एका फुलांनी वर्णिले
महत्त्व  आपापले स्वतःचे

लिहीली होती कन्येसाठी
भावली  तिला अतिशय
सहज केली तिने तोंडपाठ
समजून घेऊन आशय

साध्या सोप्या शब्दात 
केली शब्दांची  मांडणी
बालभारती पुस्तकासाठी
आली की, तिजला मागणी

कखुष झाले मी  मनातून
पहिली रचिली, कविता सहज 
रंगवूनी  भावना  मनीच्या
तिचे गुण गाण्याची नुरली गरज

वैशाली वर्तक 
अहमदाबाद














    *माझे लेखन
करिते लिखाण मी नेमाने
मज मिळे आत्म समाधान
माझ्या मनीचे भाव उमटे
मानते  मी शारदेचे वरदान

सहज घडते लिखाण 
जसा मिळता  विषय
करुनिया विचार  मंथन
घेते ध्यानी आधीच आशय

कधी लेखणी रंगवी शब्द
प्रबोधन वा जपण्या संस्कृती 
तर कधी महत्त्व  आरोग्याचे
पण लिखाण  ही झालीय प्रवृत्ती 
  

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची


वैशाली वर्तक
अहमदाबाद


     
















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...