सावली प्रकाशन समुह
स्पर्धेसाठी
ओळ काव्य
विषय - नव चैतन्याची पालवी फुलू दे
शीर्षक - *कृपेच्या ओंजळी* 20/4/21
आला पहा ऋतुंचा राजा वसंत
संपली शिशिरची ती पानगळ
दिसे लाल कोवळी तांबूस पर्णे
दूर सारा मनातील मरगळ 1
येता वसंत, सृष्टी ची शोभा न्यारी
रानोमाळी पक्ष्यांची ऐकावी गाणी
दिसे सर्वत्र नव चैतन्य भारी
कोकीळ कुजन ऐकावे ते रानी
वाहू द्या वारे मनी आशेचे
निसर्ग देई संदेश उत्साहाचा
सृष्टी देतसे सदैव संजीवन
भाव सकारात्मक तो चैतन्याचा
पहा कशी पळेल ती महामारी
नव चैतन्याची फुलू दे पालवी
लतावृक्ष सम मने करु पल्लवित
सहजच नैराश्यास दूर घालवी
नव चैतन्याची फुलू दे पालवी
फारच निराशाची आली काजळी
देवा तुलाच सारे आले शरण
तव कृपेच्या भरुन दे ओंजळी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा