अ भा म सा प स्वप्नगंध समूह आयोजित
विषय - जरा विसावू या वळणावर
श्रमलो दमलो पळूनी सदाकाळ
*जरा विसावू या वळणावर*
नव्हता निवांत क्षण तेव्हा
आता उपभोगू आनंद क्षणभर
कर्तव्याच्या पठडीत चालता
सदैव राहिलो त्यात रममाण
गृहस्थाश्रम सांभाळण्यात
स्वतःला झोकून झालो बेभान
आयुष्याच्या सायंकाळी
आता जगुया स्वतःसाठी
पूरे करुया राहिलेले छंद
सुंदर आयुष्य असता गाठी
जीवन धावपळीत राहिलेल्या
स्वप्ने इच्छांची करुया फुलवात
साथीदारा सह तेजाळूया
सुंदर मस्त वळणावर सांजवात
निहाळुया सुंदरता या निसर्गाची
देणे लागतो आपण समाजाचे
समाज कार्यास हातभर लावूनी
कर्तव्य करुया सुजाण नागरिकाचे
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा