यारिया साहित्य कला समूह
आयोजित काव्य लेखन उपक्रमासाठी
विषय -- पत्रास कारण की
शीर्षक - *विनवणी*
पत्रास खास कारण की
कशी आणलीस रे वेळ
कुणा कडे जाऊ सांग ना
काय चालविलास रे खेळ
देवा करिते विनवाणी
करना कृपा जगावरी
किती भयावह वेळ ही
उघड ना ,नयन क्षणभरी
सारे व्यवहार झाले ठप्प
घरीच बसावे लागे नित्य
रोज कमविणे व खाणे
त्या हातांना लागे ना चित्त
कुठून आणतील भाकर
कसा देतील लेकरामुखी घास
तूची तारण्यास देवा आता
सूचवना उपाय हमखास
जाण तू भाव अंतरीचे
दूर करण्या ही अवस्था
सारे जन करती तव धावा
विस्कळीत झाली सुव्यवस्था.
ऐकना आता तारी देवा
आमची ही विनवणी
कर जग पूर्वीवत हसरे
हीच आमुची विनम्र मागणी
वैशाली वर्तक
भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच बुलढाणा आयोजित उपक्रम
राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धा
विषय..पत्र लिहिण्यास कारण की,
शीर्षक...*आठवणी मनीच्या*
दिन हरपले राहिल्या फक्त आठवणी
वाट पहात बसणे वाटे भारी
कधी येईल पोस्टमन
पत्र देण्या आपल्या दारी
विचार पूस होई एकमेकांना
आला का ग पोस्ट मन
पत्र नाही मुलांचे कधीचे
काळजीत जातात एक एक क्षण
आता नाही मजा पत्राची
तेच तेच पत्र वाचण्याची
वाचून घडी करुन जपून
ठेवलेल्या अनेक पत्रांची
आता केले विज्ञानाने
जग अतिशय सुलभ
प्रत्यक्ष पहाणे होते क्षणात
काळजी , चिंतेचे नुरे मळभ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा