रविवार, ११ एप्रिल, २०२१

कविता माझी अभिलाषा /





    *माझे लेखन
करिते लिखाण मी नेमाने
मज मिळे आत्म समाधान
माझ्या मनीचे भाव उमटे
मानते  मी शारदेचे वरदान

सहज घडते लिखाण 
जसा मिळता  विषय
करुनिया विचार  मंथन
घेते ध्यानी आधीच आशय

कधी लेखणी रंगवी शब्द
प्रबोधन वा जपण्या संस्कृती 
तर कधी महत्त्व  आरोग्याचे
पण लिखाण  ही झालीय प्रवृत्ती 
  

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची


वैशाली वर्तक
अहमदाबाद




शीर्षक --**माझी आभिलाषा**

माझी कविता असे साधी
नसे तयात राजकारण
दावते कधी निसर्गाचे रुप
 सुंदर कसे ठेवावे पर्यावरण

  कवितेत माझ्या भाव सकारात्मक
 असली तमेची कधी निशा
लगेच दाखवी उदाहरण
 पहा उज्वल आशेची उषा

मन धाव घेई अध्यात्माकडे
दर्शन घडवी संतजनांचे
कधी रंगवी बालमने तर
रंगविते सुंदर चित्र फुलांचे

देते कविता संदेश जनमनाला
सलाम सदाची जवानांना
सांगते आत्म निर्भय बनण्या
कौतुकाची थाप देश सेवकांना


सदा बहरावी माझी कविता
करण्या सेवा माय मराठीची
पसरण्या ख्याती जगताती
हीच सदैव इच्छा वैशालीची

वैशाली वर्तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...