सोमवार, १२ एप्रिल, २०२१

V. रंगी रंगला श्रीरंग

पहा गोकुळात कान्हा
खेळ खेळे गोपी संग
आनंदात रंगलेला
रंग खेळण्यात दंग

विसरूनी मी तू पण
पहा कसा झाला दंग
देहभान विसरुनी
*रंगी रंगला श्रीरंग*

मुरलीचा येता सूर
होई राधिका बावरी 
रंगी रंगे मोहनाच्या
वेड लावे तो श्रीहरी

दावी धरा  रंगोत्सव
येता पहा हा वसंत 
सृष्टी पहा बहुरंगी
रंग  खेळूया हसत 

भेदभाव सारु दूर
जैसा खेळे तो श्रीरंग
 समतेचा भाव दिसे
आनंदात होऊ दंग

पहा मूर्तीमंत प्रेम
असे भक्तीचे प्रतीक
*रंगी रंगला श्रीरंग*
प्रेम तयांचे सात्विक 


वैशाली वर्तक

पहा गोकुळात कान्हा, खेळ खेळे गोपी संग
आनंदात रंगलेला ,रंग खेळण्यात दंग

विसरूनी मी तू पण ,पहा कसा झाला दंग
 हरपूनी देहभान   नाच करी तो  मलंग
भेदभाव सारुनिया,     मनी एकची उमंग
आनंदात रंगलेला ,रंग खेळण्यात दंग              १

मुरलीचा येता सूर होई राधिका बावरी 
रंगी रंगे मोहनाच्या , वेड लावे तो श्रीहरी
वृंदावनी  खेळे राधा मन मोहनाच्या संग
आनंदात रंगलेला ,रंग खेळण्यात दंग              २   

                                             
मूर्ती मंत असे प्रेम  भक्तिचे ते प्रतिक
राधा रमण दोघांचे   प्रेम   ते सात्विक
  अव्दैताचा असे आत्मा रंगी रंगला श्रीरंग
आनंदात रंगलेला ,रंग खेळण्यात दंग           ३
वैशाली वर्तक १३/७/२२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सरत्या वर्षाने काय दिले

स्वप्न गंध स्पर्धा समूह आयोजित  झटपट काव्यलेखन स्पर्धा  विषय     सरत्या वर्षाने काय दिले  विचार करता मनी  काय मिळाले गत वर्षात  दिले सुख आनं...