माहेर
शब्द उच्चारता माहेर
आठवांची साठवण
उभे राही डोळ्यासमोर
एका क्षणात बालपण
आईचा तो प्रेमळ हात
भासे फिरला अंगावर
बाबांची सय येताची
वाटे जावे घरी क्षणभर
कसे विसर पडतील
ओढ जीवाला सदाची
दिन ते बागडलेले
सय येता माहेराची
दुधावरची मऊ साय
अशी आजीची ती माया
क्षणा क्षणा नजरेत आठवे
तिची मूर्तीमंत प्रेमळ छाया
संस्कृती ची परंपरा
लेक सोडुनिया *माहेर*
सावरते दोन कुळे
कुटुंबाला तो आहेर
वैशाली वर्तक
असा मी हा प ठाणे जिल्हा २
आयोजित
विषय - माहेर
अष्टाक्षरी
शब्द वदता माहेर
आठवांची साठवण
उभे ते डोळ्यासमोर
एका क्षणी बालपण
हात आईचा प्रेमळ
भासे फिरे अंगावर
सय बाबांची येता
जावे घरी क्षणभर
कशी विसर पडेल
ओढ जीवाला सदाची
दिन ते बागडलेले
सय येता माहेराची
मऊ साय दुधावर
अशी आजीची ती माया
क्षणा क्षणाला आठवे
तिची मूर्तीमंत छाया
संस्कृतीची परंपरा
लेक सोडुनी *माहेर*
सावरते दोन कुळे
सासरला तो आहेर
वैशाली वर्तक
अहमदाबाद
प्रेमाची अक्षरे समूह आयोजित
उपक्रम
अभंग लेखन
विषय - माहेर
शब्दच माहेर । करी आठवण ।
मनी बालपण । आठवते ।।
प्रेमाचा तो हात । भासे अंगावर ।
फिरे क्षणभर । आईचा तो ।।
क्षणोक्षणी सय । आजीची ती माया ।
ममतेची छाया । मनी सदा ।।
दिन ते मौजेचे । ओढ सदैवाची ।
आस माहेराची । लागे सदा ।।
लेक सोडुनिया । स्वतःचे माहेर ।
जणु तो आहेर । सासराला ।।
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा