जीवन आवलबून निसर्गावर
जतन करण्याचे हवे सदा वेड
ऋण निसर्ग देवतेचे असे अपार
शिकुया करण्या परत फेड
लावुया लतावृक्ष अंगणात
देतील छाया माया आपणास
सत् पुरुषासम असती तेची
देती प्राणवायु हवा जगण्यास
नका करु नाश राना वनांचा
तयातच साठा वनौषधांचा
जलचर सृष्टी वसे तयातच
-हास होतो नकळत निसर्गाचा
जरी जल असे निसर्ग दत्त
टाळा अपव्यय जाणूनी मोल
मुरवा जलास सदा मातीत
राखण्या निसर्गाचा समतोल
प्रगतीच्या पहा नावाखाली
मानवाचा वाढलाय अती लोभ
म्हणू नका निसर्ग देवतेचा कोप
थांबवूया तो आता क्षोभ
निसर्ग कृपेने सजे सारी सृष्टी
देवतेचे किती वर्णावे गुण गान
तिच देते आनंदमय दृष्टी
असे निसर्ग देवता महान
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा