विषय - माझी शब्द फुले
शीर्षक -- शब्द उधळण
मी माझ्या शब्दांचे
करिते स्वागत
शब्द गुंफण्याची
कला अवगत 1
माझी शब्द फुले
सुगंधी असती
सदा साहित्यात
शोभून दिसती 2
मोजून मापून
शब्दांचा वापर
फापट पसारा
नकोच खापर 3
मनीचे विचार
शब्दांची सोबत
होतेची तयार
छान मनोगत 4
विचार कल्पना
मनी उमलता
शब्द फुले माझी
दिसे बहरता 5
शब्द फुले माझी
विविध रंगात
सुख धैर्य भाव
दावी साहित्यात 6
शब्दफुले अशी
हृदयाच्या ठायी
वाहते तयांना
शारदेच्या पायी 7
वैशाली वर्तक
अहमदाबाद 24/1/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा