सारे संत जन । सांगे तत्व ज्ञान
असे ज्ञान खाण । सर्वासाठी 1
दासांचे ते श्लोक । जणू गीता सार
जीवनाचा भार । दूर सारी 2
विश्व शांती मंत्र । देती ज्ञानदेव
अमृताची ठेव । विश्वालागी 3
जगाच्या कल्याणा । हे पसायदान
संस्कृतीची शान । ज्ञानोबांची 4
ठेवा दृढ श्रद्धा । आहे विठूराया ।
जगावरी माया । तुका सांगे ।। 5
संत बोले तैसे । करी आचरण ।
वंदती चरण । सर्व लोक ।। 6
नसे उच नीच। सर्व ची समान
सांगते महान । संतवाणी ।। 7
जनांचा उध्दार । संताच्या विभुती
असती जगती । संतसारे ।। 8
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा