लेखणी माझी देखणी 8/2/2021
जेष्ठ गझलकार स्व किरण जोगळेकर
जयंती विशेष काव्य लेखन महा स्पर्धा
फेरी क्र . 3 बालकविता
विषय -- हत्ती
जाड्या हत्ती
विचारात रस्त्याने ,चालत होता हत्ती
का बरे इतर प्राणी, नसती अवजड
माझेच शरीर अवाढव्य किती ?
तयांचे बांधे, कसे नाही बोजड 1
पोट तर माझे , जणू कोठार घर
पंधरा वीस लाडू , सहज होती फस्त
केळ्यांच्या घड तर , एकची घासात
बादली भरुनी पाणी , पितो मी मस्त 2
असा हा आहार , असताची माझा
कसे कमी होणार, सांगा हे शरीर
तरी करतोय सदा, विचार मी मनात
उगा नको व्हायला, कदा तो उरीर 3
मानव करतात , रोजची व्यायाम
देऊन शरीरास , शिस्तीत तालीम
सुडौल सृदृढ , राखण्या बांधा
उपाय करतात, अनेक जालीम 4
डाॕक्टरांना विचारण्या, गेला हत्ती
दिले औषध तया , बादली भरुनी
बांध्याची चिंता , नका करु म्हणताच
सोंड घातली हत्ती ने , घाई करुनी 5
अरे रामा s रामा , किती कडू औषध
म्हणत असे हत्ती, पळतच सुटला
नकोची मला तो , सुडौल बांधा
तेव्हापासून हत्ती , जाड्याच राहिला. 6
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा