माणसात मी 12/2/2021
आहे मानव , सामाजिक प्राणी
रहातो वाढतो तो समाजात
आदि काळापासून राहे तो
माणसांच्या च मेळाव्यात
कसा असेन मग मी
या जगताहूनी वेगळा
संत शिकवणीने मी देखील
पहातो, देव ...माणसात आगळा
मानवता हा मानतो धर्म
प्रत्येक माणसातच वसे देव
जाणतो जीवनाचे हे मर्म
जपतो संस्कृती ची अमुल्य ठेव
मानवास हवा, मानव संगतीस
पाण्या वाचून, जगत नाही मीन
*माणसात मी* रहातो मजेत
तया वीण जीवन असे हीन
माणुसकीने सदा जगता
मित्र मंडळी मिळे खूप सारी
खरी असे हीच श्रीमंती
माणसात मी, शोधणे ही किमया न्यारी
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा