यारिया साहित्य कला समूह
विषय-- कलश
कलश
नाव घेताची कलश
भाव मंगल येती मनी
पूजा न् अर्चा असावी
हेच कळते मना क्षणी
जल नद्यांचे पवित्र
येती सप्त नद्या पूजनात
मिळे भावनिक पवित्र ता
भक्ती भावे कलशात
लग्न वा मंगल कार्यी
हाच कलश लावी माथी
स्मरून नद्यांचे पवित्र जल
तीर्थ म्हणून घेई हाती
डोळा लावती पाणी वधूवरास
होता संपन्न लग्न सोहळा
हाती घेऊनी जल कलशाचा
करवल्या होती भोवती गोळा
नागवेली पर्णे वर श्रीफळ
स्वस्तिक काढी कुंकूवाचे
ठेवून कलशात सुपारी पैसे
हे प्रतिक असे मांगल्याचे
वैशाली वर्तक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा