अ भा म सा प स्वप्नगंध समुह
अष्टाक्षरी काव्य
विषय -- आयुष्याची नाव
तूची असे करविता
नसे चिंता मज उरी
माझ्या आयुष्याची नाव
सोपविली तव करी
येता कितीही संकटे
तूच आहे माझा त्राता
भय नुरते मजला
तूच विश्वाचा विधाता
मद मोह मत्सराचा
नको नावेत वावर
आयुष्याची नाव माझ्या
तूची सदाची सावर
सदा घडो तुझी सेवा
मुखी नाम निरंतर
तूची दिले सर्व काही
तुझा न व्हावा विसर
तव कृपा प्रसादाचा
राहो हात मज शिरी
आयुष्याची नाव माझी
तूच लाव पैलतीरी
वैशाली वर्तक
अहमदाबाद
होते बसले सागरतीरी
होत्या बोटी तरंगत
लहान मोठ्या अनेक
आल्या किनाऱी धडकत
मन तंद्रीत विचारांच्या
वेळेचा न राहिला ठाव
आला विचार मनात
आयुष्य पण आहे नाव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा