येती मनी अनेक विचार
पाहूनी तो कागद कोरा
कलाकार शब्द शिल्पकाराचे भाव
उमटवून दावी कलेचा तोरा
मनीचे भाव दावी कवी
झरता लेखणी कागदावर
कधी भक्तीचे वा प्रेमाचे
दावी भावना खरोखर
कुणी चित्रकार घेऊनी कुंचला
रेखाटतो विविध चित्रे सुंदर
निसर्ग दर्शन घडवी आपणा
कोरा कागद दिसे मनोहर
येता कलाकाराच्या हाती
कला अद्भुत दावणे त्याची गरज
विविध आकार देऊन कागदास
रुप कागदाचे बदली सहज
नको व्यर्थ व्यय कागदाचा
लेखणी कागदाची रहाण्या सांगड
प्रगतीच्या नावे नको वृक्षतोड
होणार नाही दोघांची परवड.
वैशाली वर्तक 19/2/2021
शब्द रजनी साहित्य समूह
विषय कोरे पान
येती मनात विचार
पाहूनिया कोरे पान
शब्द शिल्पकार दावी
भाव उमटूनी छान
भाव मनीचे खुलले
क्षणी झरता लेखणी
कधी भक्तीचे प्रेमाचे
भासे लेखणी देखणी
चित्रकारे कुंचल्याने
चित्र काढले सुंदर
केले निसर्ग दर्शन
कोरेपान मनोहर
आला पहा कलाकार
दावी पहा कलाकृती
देत आकार पानास
झाल्या विविध आकृती
नको व्यय कागदाचा
घालू पानांची सांगड
-हास नको वनश्रीचा
घेऊ ध्यानी परवड.
वैशाली वर्तक
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा