गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

ओळकाव्य अष्टाक्षरी नाळ जोडली मातीशी

शब्दरजनी साहित्य  समूह आयोजित  
प्रथम  वर्धापन दिन राज्य स्तरीय  काव्य लेखन स्पर्धा
विषय - नाळ जोडली मातीशी
अष्टाक्षरी काव्य

शीर्षक - भुमीपूत्र 

आहे पोशिंदा जगाचा
 *नाळ जुळली मातीशी*
 मानी मातीलाच माय
रोज खेळतो  तिच्याशी

काळ्या  शार भुईवर
चाले नांगर जोमात
काळ्या मातीला कसून
बळी करे सुरुवात       

झळा उन्हाच्या साहूनी
काळी माय  भेगाळली
वाट पहाते मृगाची
पाण्यासाठी आसुसली

नाते जुळले मातीशी
बळी मोती पिकवितो   
भिजे घामाच्या धारात
कष्ट शिवारी करितो

मृग नक्षत्र  पाण्याने
बीज अंकुर फुटेल 
कोंब डोकावून पाही
मन  आनंदे भरेल

पीक येईल शेतात
शेत दिसेल   हरित
मिळतील मोती छान
फळो कष्टाचे फलित

स्मरुनिया भक्ती भावे
केली बियांची पेरणी      
फुलू दे रे शेत माझे
सदा नमतो चरणी


वैशाली वर्तक
अहमदाबाद  23/1/2021

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

कष्टाचे चीज

कष्टाचे चीज      खरच त्यावेळी कापड गिरण्या जोरात चालायच्या.व नोक-या पण  मिळत होत्या.. जे कष्ट करण्यास तयार होते.त्यांना कष्ट करुन खरच शुन्या...