सावली प्रकाशन समूह
उपक्रम
विषय-- गीत मी सूर तू
मधुर सुरेल
*गीत मी सूर तू*
ऐकण्या अधीर
कर सुश्राव्य तू 1
मम गीतातला
शब्द मी स्वर तू
लयही साधता
भावना सांग तू 2
गीत तूची माझे
प्रेमाने गायिले
जीव ओतुनिया
प्राण ओतियिले 3
भाव गीतातला
तूची तो जाणिला
किती रंगवूनी
मज तू दाविला 4
सप्त सुरांनी त्या
गीत फुलवले
तालात ऐकता
मन संतोषले 5
तुझ्या कंठातले
गीत ते मोलाचे
लुब्ध करी जीवा
शब्द अमृताचे 6
वैशाली वर्तक.
अहमदाबाद
वरील सहाक्षरीचे गीत
सुरेल मधुर, गीत मी सूर तू
ऐकण्या अधीर कर सुश्राव्य तू
मम गीतातला शब्द मी स्वर तू
लयही साधता भावना सांग तू
गीत तूची माझे प्रेमाने गायिले
जीव ओतुनिया प्राण ओतियिले
भाव गीतातलातूची तो जाणिला
किती रंगवूनी मज तू दाविला
सप्त सुरांनी त्यागीत फुलवले
तालात ऐकतामन संतोषले
तुझ्या कंठातले गीत ते मोलाचे
लुब्ध करी जीवा शब्द अमृताचे
वैशाली वर्तक.
अहमदाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा